आपण वापरत असलेल्या प्लास्टिक ची ओळख - आर्टिकल 1

प्लास्टिक प्रकार 1 - Polyethylene Terephthalate (PETE or PET)

PET हा प्रकार सामान्यतः ग्राहकोपयोगी वस्तू, जास्त प्रमाणात पाणी, शीत पेय यांच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरलं जातं. काही औषधे साठवण्यासाठी किंवा खाद्य तेलाच्या बाटल्या वगैरे.

हे प्लास्टिक फक्त एकच वेळ वापरल्या नंतर नष्ट करायचं असत. ह्याचा परत वापर केल्यास त्यातुन घातक रसायन बाहेर येण्याची अथवा जंतुसंसर्ग होण्याची भीती असते.

PET प्लास्टिकला खराब होण्यापासून व त्यात घातक रसायन तयार होण्यापासून रोखण्यासाठी योग्यप्रकारे साफ करणे आवश्यक आहे. Polyethylene Terephthalates कॅन्सरला निमंत्रण देऊ शकते. हे प्लास्टिक तोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करण्यात येऊन नंतर त्यावर प्रक्रिया करून नवीन PET बाटल्या करण्यात येऊ शकतात अथवा त्याचे polyester चे धागे बनू शकतात.

सावधान - क्रमांक 1 PET ह्या पासून बनवलेल्या प्लास्टिकच्या वस्तू या नेहमीच पुनर्प्रक्रिया करण्याकरता देण्यात याव्यात. त्यांचा कधीही पुनर्वापर करू नये.

ऊर्जा फाउंडेशन
प्लास्टिकचा वापर टाळा
वसुंधरेच रक्षण करा

Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies