आपण वापरत असलेल्या प्लास्टिक ची ओळख - आर्टिकल 2

प्लास्टिक प्रकार 2 - HDPE (High-Density Polyethylene)

प्लास्टिक 2 हा प्लास्टिकच्या प्रकारांपैकी एक सर्वात सुरक्षित प्रकार आहे. ह्या प्रकारच्या प्लास्टिकला घनतेच्या प्रमाणात जास्त मजबूतपणा असतो ज्याच्या परिणाम म्हणून अतिशय उत्तम झीज प्रतिरोधक प्लास्टिक निर्माण होते.

HDPE च्या वस्तूंना गरम किंवा गार करू शकत असल्याने त्या वेगवेगळ्या वातावरणात वापरू शकतो. हे प्लास्टिक चांगल्यापैकी रासायनिक प्रतिरोधक आहे. याचाच अर्थ असा की ह्या प्लास्टिकची त्यात साठवलेल्या कोणत्याही अन्नपदार्थ, शीतपेय किंवा घरगुती वापरात येणाऱ्या कोणत्याही रासायनिक पदार्थांवर प्रक्रिया होत नाही.

प्लास्टिक क्रमांक 2 चा आपण कोणत्याही दुष्परिणामांशिवाय पुनर्वापर करू शकतो. प्लास्टिक 2 वर सहजरित्या 10 वेळा पुनर्प्रक्रिया करू शकतो.

HDPE 2 च्या रिकाम्या डब्यां पासून आपण परत नवीन डबे पुनर्निर्माण करू शकतो. हडप पासून बनवलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करू शकतो. तसेच सहजगत्या पुनर्प्रक्रिया करू शकतो.

टिकाऊपणा आणि विश्वासहार्यता यामुळेच HDPE 2 ला अनेकाविध वस्तूंच्या निर्मितीच्या उपयोगाकरिता कार्यक्षम मानले जाते.

कडक वस्तू, उदा. दूध, पाणी आणि विविध रस बाटल्या. शाम्पू, साबण, कंडिशनरच्या बाटल्या आणि वैयक्तिक उपयोगात येणाऱ्या पदार्थ घरगुती वापरातील व साबण वगैरे शितकपाटात वापरता येतात त्या पिशव्या, लहान मुलांची खेळणी, शेती कामाचे पाईप, प्लास्टिक आणि लाकूड संयुगेवायर आणि केबल्सची आवरणेबाहेरील फर्निचर, इंधन टाक्या आणि वाहनात वापरण्यात येणाऱ्या तेलाचे डबे .

लवचिक किंवा मऊ प्लास्टिक उदा. धान्य पिशव्या / शॉपिंग पिशव्या, पावाच्या पिशव्या, कचरा पिशव्या, प्लास्टिक मेलिंग लिफाफा, व्यवसायिक आवरणे.

सहसा, HDPE प्लास्टिक चा वापर जमिनीत पुरण्यात येणाऱ्या केबल्स किंवा ज्यात जास्त प्रतिकार शक्ती आणि मजबुती आवश्यक आहे त्यात केला जातो.

अन्नपदार्थांचे डब्बे आपल्या सुख्या कचऱ्यात टाकण्यापूर्वी त्यातील अन्नपदार्थ पूर्णपणे टाकून देऊन स्वच्छ करण्याची खबरदारी घ्यावी.

ऊर्जा फाउंडेशन
प्लास्टिकचा वापर टाळा
वसुंधरेच रक्षण करा

Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies