आपण वापरत असलेल्या प्लास्टिक ची ओळख - आर्टिकल 3

प्लास्टिक प्रकार 3 - PVC (Polyvinyl Chloride)

PVC (polyvinyl chloride) हे खूप धोकादायक आणि कमीतकमी पुनर्वापर योग्य प्लास्टिक पैकी एक प्लास्टिक आहे. तरीही, प्लास्टिक नंबर 3 हे PET प्लास्टिक म्हणून उपयोगात आणले जाते. PVC पुनर्प्रक्रिया क्रमांक म्हणजे हे प्लास्टिक त्यात असलेल्या मऊपणा निर्माण करणाऱ्या थॅलेट नावाच्या रसायनामुळे मजबूत आणि लवचिक बनत. हे संप्रेरक प्रणाली (harmonal system).

आणखी काही DEHA सारखी जास्त घातक रसायनांची प्लास्टिक 3 च्या पूर्ण प्रवासात निर्मिती होते. ते मुलांच्या वाढीवर, रोगप्रतिकारक प्रणाली आणि अंतःस्रावी प्रणालीवर घातक परिणाम करतात. ही घातक रसायन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. प्लास्टिक नंबर 3 पासून शॉवरचे पडदे, सफाई करता लागणाऱ्या साबणाच्या बाटल्या, पाइप्स, खाद्य तेलाच्या बाटल्या, खिडक्या आणि दाराच्या चौकटी, लाद्या, पारदर्शक खायच्या वस्तूंची आवरणे इ. बनवले जातात.

गरम केल्यानंतर PVC जास्त घातक बनत. म्हणून प्लास्टिक 3 पासून बनवलेल्या वस्तूत कधीही अन्न शिजवू नये कींवा त्यात अन्न पदार्थ साठवण्याचाही प्रयत्न करू नये. लहान मुलांची खेळणी किंवा फुगवलेल्या वस्तू ह्या PVC पासून बनल्या नाहीत ह्याची खात्री करावी.

PVC प्लास्टिकचा वेगवेगळ्या पदार्थांमुळे पुनर्वापर करणे ही अव्यवहार्य गोष्ट आहे. प्लास्टिक क्रमांक 3 चा होता होईल तो कमीतकमी वापर करावा. PVC पासून बनवलेल्या वस्तु ह्या पुनर्वापर करण्या योग्य नसतात.

ऊर्जा फाउंडेशन
प्लास्टिकचा वापर टाळा
वसुंधरेच रक्षण करा

Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies