आपण वापरत असलेल्या प्लास्टिक ची ओळख - आर्टिकल 5

प्लास्टिक प्रकार 5 - PP (Polypropylene)

Polypropylene प्लास्टिक हे टणक आणि वजनाला हलके आणि त्याला अत्युत्तम अशी उष्णता रोधक गुणवत्ता असते. हे दमटपणा, वंगण आणि रसायन ह्यांच्या विरोधात अडथळा बनते. जर तुम्ही तृणधान्यापासून बनवलेल्या अन्न पदार्थांच्या डब्याच्या आतील पातळ असे प्लास्टिकचे आवरण काढून बघितले, तर ते polypropylene ने बनलेले असते. ते त्या डब्याच्या आतील पदार्थाला सुखे आणि ताजे ठेवते.

PP हे सामान्यतः विल्हेवाट लावण्यायोग्य diapers, प्लास्टिक बाटल्यांची आवरणे, मार्गारीन आणि योगर्टचे डबे, बटाटा चिप्सच्या पिशव्या, straws, पॅकिंगचे टेप आणि धागे इ. बनवण्यासाठी सुद्धा वापरले जाते. PP वर बरेच वेळा microwave सुरक्षित असे छापलेले असते. हे प्लास्टिक बळकट आणि उष्णतेला लवचिक असते. आशा प्लास्टिकला जेंव्हा खड्डे पडतात किंवा झीज होताना दिसून येते, अशावेळी धोका असतो आणि त्याच वेळी त्या वस्तूचा microwave आणि डिश वॉशर मधला वापर बंद केला पाहिजे.

LDPE प्रमाणेच PP सुद्धा अन्न आणि पेय साठवण्यासाठी योग्य पर्याय मानला जातो. जरी PP वापरण्यास योग्य आशा चांगल्या गुणवत्ता धारण करत असेल तरी हे सहज प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यायोग्य नाही आणि त्यामुळे मानवाला दमा आणि संप्रेरक (हार्मोन्स) मध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो.

तरीही PP हे पुन्हा वापर करण्यायोग्य आहे असे मानले जाते आणि काही अंशी PP पासून प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यासाठी वस्तू बनवल्या जातात.

ऊर्जा फाउंडेशन
प्लास्टिकचा वापर टाळा
वसुंधरेच रक्षण करा

Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies