आपण वापरत असलेल्या प्लास्टिक ची ओळख - आर्टिकल 6

प्लास्टिक प्रकार 6 - PS (Polystyrene) OR Styrofoam.

Polystyrene हे स्वस्त, वजनाला हलके आणि सहज स्वरूप प्लास्टिक असून त्याचे अनेकविध उपयोग आहेत. बरेचवेळा ह्याचा उपयोग disposeble foam drinking cups, अन्नाचे डबे, अंड्याचे cartans, प्लास्टिकच्या सहलीतील वस्तू, foam आवरणे बनवण्यासाठी होतो.

Polystyrene रचनात्मक रित्या कमकुवत आणि टोकाचे हलके असते, सहजरित्या तुटते आणि आसपासच्या नैसर्गिक वातावरणात सहजगत्या विखुरते. जगभरातील सर्व समुद्र किनाऱ्यावर polystyrene चे तुकडे विखुरलेले असतात. आणि अमोज समुद्री जीवांच्या शरीरात शिरून त्यांच्या आरोग्यावर अफाट परिणाम करतात.

polystyrene मध्ये अन्न साठवल्यास (microwave मध्ये गरम केल्यास जास्त प्रमाणात) styrene हे रसायन बाहेर पडत जे मानवाला कॅन्सरची शक्यता असते. Polystyrene मध्ये असलेली रसायन मानवी आरोग्य आणि पुनरोत्पादन प्रणाली अकार्यक्षम बनवण्यातील एक दुवा असतात.

6 नंबर प्लास्टिक उत्पादन करण्यासाठी स्वस्त आहे, वजनाला हलकं आहे, ते सहजगत्या घडवता येत. आपल्याला हे कठीण polystyrene च्या रूपाने मिळत आणि styrofoam बनते. त्याचा जितकं जास्त जमेल तितकं वापर टाळणं हेच योग्य आहे. 6 नंबर प्लास्टिक अजिबात पुन्हा वापरू नयेप्रक्रिया करून पुनर्वापर हा पर्याय polystyrene उत्पादनांमध्ये दुरान्वयानेही उपलब्ध नाही.

ऊर्जा फाउंडेशन
प्लास्टिकचा वापर टाळा
वसुंधरेच रक्षण करा

Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies