प्लास्टिक प्रकार 7 - Other (BPA, Polycarbonate and LEXAN)
7 क्रमांकची श्रेणी सर्व प्रकारच्या polycarbonate (PC) आणि "इतर " प्लस्टिकना समाविष्ठ करण्यासाठी तयार केली होती, म्हणूनच पुन्हा वापराचे आणि प्रक्रिया करून पुनर्वापराचे कोणतेही निकष ह्या श्रेणीत कायम केलेले नाहीत.
आधीच्या 6 प्लास्टिकच्या प्रकारात जे समाविष्ट केलेले नाही ते ते सर्व या प्रकारात मोडतात. उदा. नायलॉन, फायबर ग्लास, acrylic, plycarbonate. नंबर 7 चे प्लास्टिक लहान मुलांच्या बाटल्या, sippy cups, water cooler च्या बाटल्या, आणि कारचे पार्टस बनवण्यासाठी वापरण्यात येते. Polycarbonate पासून बनलेल्या अन्न साठवण्याच्या डब्यात BPA सापडत ज्या डब्याच्या तळावर नेहमीच "PC" अशी अक्षर पुनर्वापराच्या नंबर 7 सह चिन्हांकित असतात.
Polycarbonate हे प्लास्टिक Bisphenol - A (BPA) या रसायना पासून बनवले जाते. आणि BPA हे अतिशय घातक आहे कारण ते संप्रेरक प्रणाली भंग करत. हल्ली तुम्ही कोणत्याही औषधांच्या दुकानात फेरफटका मारला तर तुम्हाला ओळीने कित्येक प्लास्टिक उत्पादन दिसतील ज्यावर BPA free अस शिक्कामोर्तब असत. BPA free पाण्याच्या बाटल्या.
काही polycarbonate पासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्या त्याच्यातील प्लास्टिकचा वास आणि चव कमी करून 'non leaching' म्हणून विकल्या जातात, परंतु आशा प्रकारच्या बाटल्यांमध्ये काही अंशी BPA असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरून जेंव्हा त्यात गरम पदार्थ असेल.
7 प्लास्टिक हे जर त्यावर PLA चे मिश्रण केल्याचे नमूद नसेल तर परत वापरू शकत नाही. ह्या श्रेणीत खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची प्लास्टिक उत्पादनांच वर्गीकरण झाल्यामुळे, पुनर्वापर होतो किंवा होतही नाही.
ऊर्जा फाउंडेशन
प्लास्टिकचा वापर टाळा
वसुंधरेच रक्षण करा
Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies