आपण वापरत असलेल्या आणि पुनर्वापर होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या सात प्रकारांची माहिती येथे दिली आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर काहीवेळा टाळू शकत नाही. पण आपण कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वापरतो याची आपल्याला माहिती आहे का? आपल्यापैकी बरेच जण ऊर्जा फाउंडेशनच्या "माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी " ह्या अभियानात सहभागी झाले असतील.
ऊर्जा फाउंडेशन# प्लास्टिक ला नकार द्या. # वसुंधरेच रक्षण करा. #आता आपण रोज वापरत असलेल्या प्लास्टिक विषयी जाणून घेऊया - ज्यामुळे आपण प्लास्टिक चा वापर काळजीपूर्वक करू शकु.
ह्या सात (७) लेखांच्या मालिकेत आम्ही आपल्याला आपण वापरत असलेल्या प्लास्टिकचे प्रकार आणि ते प्रकार कशाकरता वापरात आणले पाहिजेत याची माहिती देणार आहोत. काही मूलभूत माहिती. नित्यपरिचयात असलेली " एकमेकांचा पाठलाग करणारे बाण" रेखाकृती हे आपण - प्लास्टिक च्या वस्तूंवर पहातो त्याचा अर्थ असा नव्हे की ती वस्तू पुनर्वापर योग्य आहे. त्या त्रिकोणाच्या आतला छोटासा नंबर आपल्याला त्या प्लास्टिक ची खरी गोष्ट सांगतो. प्रत्येक एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या बाणांच्या त्रिकोणात एक ते सात पैकी क्रमांक दिलेला असतात ( १ ते ७ ). ह्या क्रमांकाचा उपयोग प्लास्टिक च्या वस्तू बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वापरले आहे ते कळते. पुनर्वापर योग्य प्लास्टिक आहे असा याचा अजिबातच अर्थ होत नाही
असे बरेच प्लास्टिक वर आधारित वस्तू असतात ज्या तूटतही नाहीत आणि पुनर्वापर योग्यही नसतात. इथे आम्ही तुम्हाला ह्या सर्व 7 प्रकारांची ओळख करून देत आहोत. प्रत्येक दिवशी आम्ही एका प्रकारची माहिती सादर करू. किती प्रकारचं प्लास्टिकचा आपण पुनर्वापर करू शकतो, किती प्लास्टिकचा वापर आपण टाळू शकतो, आणि प्लास्टिक हे सुखा कचरा म्हणून वेगळे करुन महानगरपालिके कडे पुनर्प्रक्रिये करता / पुढील प्रक्रियेला देणे का महत्वाचे आहे याची अधिक माहिती या लेखमालेतून आपण घेणार आहोत.
Urjaa Foundation | Developed By Sanmisha Technologies